नेर धरण परिसरातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडून प्रशासनाने धरले वेटीस, शेतकरी आक्रमक 

0

अगोदर शेतीपंपाची  कनेक्शन जोडा व नदीला पाणी न सोडण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय 

 लोकप्रभात, पुसेगाव :

नेर तलावातून लाखो रुपये खर्चून स्थानिक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी नेले आहे .सध्याची पावसाची परिस्थिती पाहता नेर तलावामध्ये जे कटापूरचे पाणी आवर्तन सुरू केले आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य वाढत चाललेले आहे. व प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांची शेतीला पाणीपुरवठ्याची कनेक्शन तोडून नेर धरणाचे पाणी नदीला सोडण्याचा घाट बांधला आहे. या अन्य या प्रशासनाच्या अन्यायी भूमिकेबाबत  आज नेर तलाव परिसरातील विविध गावांनी पाणी न सोडू देण्याचा निर्धार केला, व पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाला रोखले, आधी आमची कनेक्शन जोडा व धरण पूर्ण भरल्यानंतर पाणी सोडा अशी मागणी करण्यात आली.

   नेर तालुका खटाव या धरणामध्ये गेल्या दोन दिवसापासून हे कटापूर योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे नेर तलावामध्ये अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे नेर तलाव येथील स्थानिक अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना लाखो रुपये खर्चून कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार 30 टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना येरळा नदीला पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे व महसूल विभागाने केलेले असून त्यामुळे नेर  तलावामध्ये पाणी अद्यापही शिल्लक राहणार नाही.

   नेर तलावातून नेर ललगुण नागनाथवाडी वर्धनगड पवारवाडी बुध व परिसरालगच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाची कायदेशीर परवानगी घेऊन शेतकऱ्यांनी बँक कर्ज घेऊन दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत पाईपलाईन केलेले असून त्या पाईपलाईनच्या आधारे शेतकऱ्यांनी लाखो रुपये भांडवल घालून आले ऊस पिकाच्या लागवडी केलेले आहेत. सद्यपरिस्थिती पाहता पावसाची परिस्थिती अतिशय चिंताजनक असून शेतकऱ्यांची पिके नेर धरणातील पाईपलाईनच्या आधारावरती जीवित आहेत. असे असताना कोणत्याही शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा कोणतेही कायदेशीर नोटीस न देता मोटारीची वीज कनेक्शन तोडली आहेत. अशा परिस्थितीत पिकांची अवस्था पाहता लाखो रुपयाच्या पिकाचे नुकसान होऊ शकते असे नुकसान झाले एखाद्या शेतकऱ्यांची जीवित हानी होऊ शकते आणि असा प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.

 सद्यपरिस्थितीत जीहे कटापूर  योजनेचे आवर्तन नेर तलावामध्ये सोडण्यात आले असून,शेतकऱ्यांची मोटर कनेक्शन ताबडतोब जोडण्यात यावीत अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नेर धरण परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here