सातारा/अनिल वीर : न्यू इंग्लिश स्कूल, पिलाणी (मजरे) शाळेला नरेवाडी गावचे सुपुत्र मेघा लाईट प्रा.लि. मुबई या कंपनीचे प्रमुख साहेबराव चव्हाण यांनी दोन नवीन संगणक भेट दिले. विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्पर्धेच्या युगात कोठेही मागे राहू नये. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन साहेबराव चव्हाण यांनी दिले.
यावेळी हरी ओम स्पोर्टचे प्रमुख साहेबराव कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट युनिफॉर्म देण्याची ग्वाही दिली.तसेच दिलीप यादव यांनी सायकल बँक या शाळेच्या योजनेसाठी सहकार्य करणार असल्याचे नमूद केले. श्रीकांत कदम यांनी चालू शैक्षणिक वर्षात नववी आणि दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण पुस्तक संच भेट दिली असून इथून पुढेही प्रत्येक वर्षी नववी व दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक संच देण्याची घोषणा त्यांनी केली.चांगल्या विचारांची मांणसे एकत्र आली की खरोखर विधायक काम होत असते. याची प्रचिती आजच्या कार्यक्रम प्रसंगी आली. दुर्गम भागातील सामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन आणि स्वतःचे जिद्द चिकाटी आणि परिश्रमाने या भागातील अनेक लोक उद्योग व्यवसाय अग्रेसर झाले आहेत.
सदरच्या कार्यक्रमास संस्थेचे संचालक, स्थानिक ग्रामस्थ. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी विनोद कदम यांनी प्रास्ताविक केले. देशमुख सर यांनी आभार मानले.