सातारा /अनिल वीर : श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी मजरे,ता.सातारा या विद्यालयात शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ मुख्याध्यापक खराते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व क्रीडांगणाचे पूजन करून मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
शालेय क्रीडा सप्ताहामध्ये कबड्डी.खोखो.थाळीफेक.गोळाफेक.भाला.बुध्दीबळ. क्रिकेट अशा अनेक प्रकारच्या वैयक्तिक सांघिक .खेळाचा समावेश करण्यात आला आहे.
“विद्यार्थ्यांनी किशोर वयापासूनच खेळाचा सराव करन मेहनत घेतली पाहिजे.अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तरच ग्रामीण व दुर्गम भागातील शाळेतुन आंतरराष्ट्रीय खेळाडू घडु शकतात.पालकांनी सुध्दा पाल्याचा शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी खेळाला महत्व देऊन पाल्यास खेळास पाठिंबा दिला पाहिजे.” असे मुख्याध्यापक खराते यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले.
यावेळी क्रीडा विभाग प्रमुख म्हणून देशमुख यांनीही खेळा – विषयी मुलांना मार्गदर्शन केले. कांबळे सर व वायदंडे सर यांनी क्रिडा स्पर्धांच्या नियोजनाचे काम पाहिले.यावेळी संस्थेचे संचालक दिलीप साळुंखे ( बापू) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी,विद्यार्थी उपस्थित होते.