न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी विद्यालयात आषाढी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

0

सातारा/अनिल वीर: पायांनी चालतो तो प्रवास मननांनी चालते ती यात्रा व हृदयातून चालते ती वारी न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी मजरे यांच्या वतीने माऊलींचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वेळी विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांनी विठु माऊली वेशभूषा केली व तर काही विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी वारकरी पोषाख परिधान करून वीणा मृदुंग टाळ भगव्या पताका घेऊन दिंडीत सहभागी झाले होते.

गावातून मिरवणूक काढण्यात आली व गावातील चौकात रिंगण सोहळा संपन्न झाला विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला गावातील सर्व माऊली भक्तांना त्यांचा  आनंद घेता आला व दर्शनाचा लाभ घेता आला दिंडी मुळे गावात पंढरी नगरी तयार झाल्याचा भास सर्व माऊली भक्तांना झाला दिंडी सोहळ्या मुळे दिंडी मिरवणूक हि पंरपरा अशीच कायम स्वरुपी चालू राहावी असे सर्वजणांना वाटु लागले विठु माऊलींच्या अभंगात गाजावाजा करत दिंडी भक्ती भावाने संपन्न झाली या दिंडीत चे उत्तम नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी केले या वेळी विद्यार्थी ग्रामस्थ पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here