सातारा/अनिल वीर : धम्म उपासक-उपासीकेनी पंचशील आत्मसात केले पाहिजे.५ व्या क्रमांकाचे शिलाचे तंतोतंत पालन केले तर मानवाच्या जीवनात वाईट प्रसंग येणार नाहीत.असे प्रतिपादन जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस दिलीप फणसे यांनी केले.घोट,ता. पाटण येथे कालकथीत धर्मेंद्र पवार यांच्या पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमात आदरांजलीपर दिलीप फणसे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सुभाष पवार होते.
दिलीप फणसे म्हणाले, “पालकांनी एखदा तरी आपल्या पाल्यांना श्रामणेर शिबिरासाठी सहभागी करून दिले पाहिजे. धम्माचे आचरण हे आपल्या चालण्या – बोलण्यातून, उक्ती-कृतीतून समाजास आढळून येते.तो आपल्याकडे पाहत असतो.त्यामुळे धम्माचे सच्चे अनुयायी असाल तर आपल्यातील बढेजाव – दांभिकपणा नष्ट केला पाहिजे. आपला गाव,तालुका व इतर ठिकाणी धम्मानुसारच वावर असला पाहिजे.आपल्यामूळे इतरांना कोणत्याच प्रकारची इजा होता कामा नये.”
यावेळी सुभाष पवार यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कमिटीचे उत्तम पवार,ढोरोशी सोसायटीचे चेअरमन राजाराम भंडारे,तारळे सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजाभाऊ जगधनी, नंदकुमार काळे,बी.डी. कांबळे, गौतम कांबळे (केंद्रीय शिक्षक), पाटण तालुकाध्यक्ष आनंदा गुजर, विभागीय अध्यक्ष भानुदास सावंत,निवृत्ती अडसुळे,साहेबराव पवार,भीमराव सप्रे,चंद्रकांत अडसुळे,अनिल कांबळे (कोरेगाव),दिलीप सावंत आदींनी मनोगत व्यक्त केली.बौद्धाचार्य आनंदा भंडारे यांनी विधी पार पाडला.सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक,पत्रकार,पवार परिवार, नातेवाईक,तारळे भागातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.रणजीत पवार यांनी आभार मानले.