पर्यायी रस्ता वाहून गेल्याने पुन्हा भराव टाकून तात्पुरती डागडुजी केली !

0

सातारा/अनिल वीर : सर आली धावून रस्ता गेला वाहून…. अशी केविलवाणी परिस्थिती कासरूड, ता.महाबळेश्वर येथील पर्यायी रस्त्याची झाली आहे.तात्पुरती डागडुजी भराव टाकुन केलाही आहे.पुन्हा पावसाची सर आली तर ……

            कोयना नदीवरील पुलाचे बांधकाम संथगतीने चालु आहे.पावसाळा सुरू झाल्याने पर्यायी रस्त्याची ऐशी की तैशी झाली असून राडा-रोडा झाला आहे.त्यामुळे पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याने तो दुरुस्त म्हणून भराव टाकून तात्पुरती डागडुजी केली आहे.मुळातच पावसाळा सुरू झाला असुन अधिकचा आला तर पुन्हा पुन्हा भराव वाहून जाणार आहे. त्यामुळे लोकांना आरपार करणेही अवघड असून वाहनेही ठप्प झाली आहेत.तेव्हा सम्बधितांनी त्वरित उपाययोजना करावी. कारण,मुळातच हा पावसाचा आगार आहे.कासरूड येथे कोयना नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नेमलेल्या कंत्राटदारामार्फत गेली सुमारे ८ महिने चालू असून सद्या कामाची परिस्थती बघता सदरचा पूल पूर्ण होऊ शकत नाही. असे निदर्शनास येत आहे. तरी सदरच्या पूलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यास कासरुड तसेच हातलोटकडे जाणारा रस्ता पूर्ण बंदच होणार आहे. त्यामुळे सदर दोन्ही गावातील ग्रामस्थांना ये-जा करता येणार नाही.

सदर गावामध्ये पावसाळा कालावधीमध्ये दोन्ही गावाचा पूर्णपणे संपर्क तुटणार आहे. त्यामुळे सदर गावात होणारे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास सदर ठिकाणी शासनाची कोणतीही मदत करताही येणार नाही. सदर गावामध्ये बहुतेक हे वयस्कर ग्रामस्थ राहत आहेत. तरी एखादा ग्रामस्थ महिला किंवा बालक आजारी झाल्यास त्यांना कोणत्याही मोठ्या दवाखानामध्ये हलवता येणार नाही. त्यांना आवश्यक ती मेडिकल सुविधा पुरविता येणार नाही. तसेच गावामध्ये दररोज येणारी एस.टी.सदर पुलामुळे गावामध्ये येत नाही.त्यामुळे ग्रामस्थ महिला व शाळेतील विद्यार्थी यांना चालतच प्रवास करावा लागत आहे.पण,भरावच वाहून गेला तर चालणेही थांबणार आहे.तेव्हा पूल बांधकाम करणारे कंत्राटदाराला समज देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत.शिवाय,पर्यायी व्यवस्था काय ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here