पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वपुर्ण कार्य वृक्ष करतात.

0

सातारा/अनिल वीर : बोधिवृक्ष व इतर सर्वच वृक्षांना महत्व आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यास सजीव सृष्टीतील सर्व घटक उपयुक्त असले तरी वृक्ष सर्वाधिक पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करीत असतात.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आनंदा गुजर यांनी केले.

     भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय कोषाध्यक्ष माजी सरपंच कालकथीत भीमराव जगताप यांचा पुण्यानुमोदनचा कार्यक्रम आटोली, ता.पाटण येथे संपन्न झाला.तेव्हा वृक्षारोपण करण्यात आले.तेव्हा गुजर बोलत होते.

 यावेळी अनेक वक्त्यांनी भीमराव जगताप यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला.प्रामुख्याने संतोष जगताप,प्रवीण आगाणे व गौतम माने यांनी मनोगत केले.प्रथमतः महापुरुष व भीमराव जगताप यांच्या प्रतिमेस मान्यवर व जगताप परिवार यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. सदरच्या कार्यक्रमास मोरणा विभातील विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते,नाईकडे, घोलप,सोनवणे व संपूर्ण जगताप परिवार मोठ्या संख्येनी उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here