अनिल वीर सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ११० व्या जयतीनिमीत्त पसरणी,ता.वाई येथील भैरवनाथ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब जाधवराव (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा) होते. जाधवराव यांनी गुणवंत व विविध शिष्यवृत्ती प्राप्त इसलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रमेश डुबल (माजी प्राचार्य, किसनवीर महाविद्यालय व संचालक, यशवंतराव चाहाण मुक्त विद्यापीठ, नाशिक) यांनी रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन करून बक्षिस वितरण केले.
सभेच्या सुरवातीला विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक एम्. एम्. गायकवाड यांनी आपल्या प्रस्ताविकेमध्ये विद्यालयाच्या प्रगतीचा व विद्याव्यांच्या विविध कलागुणांचा आढावा घेताना विद्यालयातून विविध शिष्यवृत्ती प्राप्त माहिती पाहुण्यांना करून दिली. सभेचे प्रमुख वक्ते विष्णू धनावडे (माजी प्राचार्य, महात्मा फुले अध्यापक विद्यालय, सातारा) यानी आपल्या भाषणात रयत शिक्षण संरख्येच्या ‘कमावा व शिका’ या योजनेची माहिती देताना कर्मवीर आण्णा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.
आण्णाच्या जीवनातील अनेक घटना सांगताना पसरणी गावचे सुपुत्र पदमश्री बी. जी. शिर्के आणि पदमश्री शाहीर साबळे यांचे आणि कर्मवीर आण्णा यांच्यामधील संबंधाची माहिती सांगितली. तसेच संत गाडगे महाराज यांनी रयत शिक्षण संस्थेस अर्थातच आण्णाना कशा प्रकारे मदत केली ? याचीही माहिती त्यांनी दिली. भैय्यासाहेब आधवराव यांनी राजश्री शाहु महाराज आणि कर्मवीर आण्णा यांच्यामधील संबंधाची माहिती दिली.
विद्यालयातील इ. ५ वी मधील विद्यार्थीनी कु शुभ्रा शिर्के हीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्र माचे सुत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक बनसोडेसर यांनी केले. तर बक्षीस वितरणाचे सुत्रसंचालन नवरे सर व एम. एस. क्षिरसागर यांनी केले. डी. एन. गोळे यांनी आभार मानले.सदरच्य कार्यक्रमास भैरवनाथ विद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष अरुण शिके, उपसरपंच आदिनाथ महांगडे, विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र येवले,राजेंद्र शिर्के तसेच शाळा व्यवस्थापन मगितीचे अध्यक्ष पाटणे,ग्रामस्थ, शिक्षक,शिकेत्तर कर्मचारी व अध्यायनार्थी उपस्थित होते.