पांचगणी मुख्याअधिकारी गोत्यात; उच्चन्यायलयाने धाडली नोटीस 

0

महाबळेश्वर/प्रतापगङ प्रतिनीधी : पाचगणी गिरीस्थान नगरपालीकेचे मुख्याअधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांना प्रदुषण कर व प्रवासीकर ठेक्याबाबत उच्चन्यायालकडुन नोटीस पाठवण्यात आले आहे . सोमवारी मुबंई उच्च न्यायालयात याबाबात हजर राहण्याची सुचना प्रशासक तथा मुख्याअधिकारी निखील जाधव यांना देण्यात आली आहे . पाचगणी नगरपालीकेचा प्रवासीकर व प्रदुषण कर ठेक्याचा वाद आता उच्चन्यायलयात गेल्यामुळे निखीस जाधव यांच्या प्रशासकीय कारभाराबाबत पांचगणी शहरात चांगल्या चर्चा रंगु लागल्या आहेत . 

  पाचगणी गिरीस्थान नगरपालीकेकडुन सन २०२४ चा प्रदुषण कर व प्रवासी कराच्या ठेकेच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. मोमीन एन्टरप्रायजेसकडुन परवेज शेख यांनी याबाबत उच्चन्यायालयाच पिटीशन दाखल करत. पाचगणी नगरपालीकेकडुन राबवण्यात आलेल्या प्रवासी कर व प्रदुषण कर ठेक्याबाबत उच्चन्यायलयात दाद मागीतली आहे . पाचगणी नगरपालीकेकडुन प्रवासी कर व प्रदुषण कर ठेका मॅक्स लिंक या कपंनीला ७ कोटी २४ लाख रुपायला देण्यात आला असल्याची माहीती समोर आली आहे . 

 

 याचीकाकर्ते परवेझ शेख यांनी दाखल केलेल्या याचीकेत पांचगणी नगरपालीकेचे आर्थीक नुकसान करुन निवीदा प्रक्रीया पुर्ण करण्यात आली असुन या निवेदेमध्ये नियमभाह्यतेसह , ठरावीक कपंनीला झुकते माफ देत निवीदा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पाचगणी नगरपालीकेचा प्रवासी कर व प्रदुषण कर ठेका ७ कोटी ३९ लाख रुपायला भरुन देखील यापेक्षा कमी भरलेल्या ठेकेदाराला कसा जातो याचाही प्रश्न याचिका कर्ते परवेझ शेख यांनी आपल्या याचीकेत उपस्थीत केला आहे. 

  पाचगणी नगरपालीकेचा प्रवासीकर व प्रदुषण कर ठेक्याच्या निवीदेवरुन पाचगणी शहरात चांगलेच वातावरण ढवळुन निघाले आहे. उच्च न्यायलयाकडुन याबाबत अतिंम काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागुन राहीले आहे. 

प्रशासकाविरोधात दोन वेळा उच्चन्यायालयात याचीका दाखल

प्रवासीकर व प्रदुषण कराच्या ठेकेच्या निवेदेवरुन पाचगणी गिरीस्थान नगरपालीकेच्या प्रशासकाविरोधात दोन वेळा उच्चन्यायालयात याचीका दाखल होण्याची ही पहीलीच वेळ आहे. उच्चन्यायालयाने ठेक्याच्या निवेदेबाबत सुचना करुन देखील प्रशासक तथा मुख्याअधिकारी  पाचगणी नगरपरीषद यांच्या विरोधात पुन्हा एकदा उच्चन्यायलयात याचीका दाखल झाल्यामुळे पांचगणी नगरपालीकेच्या प्रशासकाच्या कारभाराबाबत शंकेची पीके वाढु लागली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here