सातारा/अनिल वीर : पाचगणी येथील सर्व्हे नंबर 128 मध्ये जागेच्या ठिकाणी शिक्षण संस्था सुरु करणारे पाकिस्तानी हस्तक ! असल्याची नोंद असल्याने त्वरित कार्यवाही करावी.अन्यथा,१५ ऑगष्ट रोजी आंदोन करु.असे आवाहन जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
सदरची नोंद रद्द करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. शिक्षण संस्था सील करा. ही शिक्षण संस्था नाही.तर पाकिस्तानची की भारताची ? हे जाहीर करा. शिक्षण संस्थेच्या पैसा पाकिस्तानात जातो का ? याचाही तपास करा.त्वरित कार्यवाही न केल्यास 15 ऑगस्ट दिवशी जिल्हाभर पाकिस्तानच्या निषेधार्थ पाकिस्तान असे नाव असलेला सातबारा उतारा फाडून निषेध नोंदवण्यात येणार आहे.
भारत देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होऊन झालेले आहेत. अमृत महोत्सव साजरा केला आहे. परंतु या आजाद असलेल्या भारतात पाचगणी, ता. महाबळेश्वर (जिल्हा – सातारा) या ठिकाणी आजही पाकिस्तान नावाचा असणारा सातबारा हा जिवंत आहे ज्या ठिकाणी हा गट नंबर आहे.त्या ठिकाणी एक शिक्षण संस्था कार्यरत आहे.या शिक्षण संस्थेचा कर हा आपलं महसूल प्रशासन जमा करत आहे. परंतु पाकिस्तान असा उल्लेख असणाऱ्या जागेवरती कारवाई आपले महसूल प्रशासन आम्हाला करीत नाही.म्हणून हा देश स्वतंत्र करण्यासाठी क्रांतीकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.त्याच देशात जर का पाकिस्तानाचे आणि त्यांच्या हस्तकांचे उदो उदो होणार असेल तर या पाचगणी या शैक्षणिक ठिकाणी भारताच्या जागेवरती पाकिस्तानच्या शैक्षणिक संस्था कार्यरत असेल तर याचा बॉस इंडिया पँथर सेनेच्यावतीने आम्ही सर्व कार्यकर्ते निषेध करत असून येत्या १५ ऑगस्टच्या आत जर का पाकिस्तानचा उल्लेख सातबारावरून रद्द करण्यात आला यावा. शिवाय, संस्थाचालकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.संस्थेची तसंच चौकशी केंद्रीय अंतरराष्ट्रीय दहशतवादी पथकाच्या अंतर्गत करण्यात आली नाही तर सातबारा फाडून आंदोलन करण्यात येईल.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी पथकाला पत्र लिहून संस्थेची कसून चौकशी करण्याबाबतही जिल्हा प्रशासनाने सांगावे.सन 1930 पासूनचे 7/12 चे उतारे निवेदनाबरोबर जोडले आहेत.
निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, परराष्ट्रमंत्री,अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री), मुख्यमंत्री, गृहमंत्री, शालेय शिक्षण मंत्री,विरोधी पक्षनेते,पालकमंत्री, मुख्य सचिव ( महाराष्ट्र राज्य), सचिव (महसूल विभाग महाराष्ट्र राज्य), पोलीस महासंचालक,/जिल्हाधिकारी, शिक्षण अधिकारी,पोलीस अधीक्षक आदिना देण्यात आलेल्या आहेत.जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड,अनमोल कांबळे आदी कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.