अनिल वीर सातारा : ज्येष्ट पत्रकार शरद महाजनी (आण्णा) यांनी आदेश खताळ व पद्माकर सोळवंडे यांना पुरस्कार देऊन नव्या पिढीतील पत्रकारांना बळ दिले आहे.असे गौरवोद्गार हरिष पाटणे यांनी काढले. ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दोघांना आदर्श पत्रकार पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हा यंदा पहिल्या वर्षी आदेश खताळ व पद्माकर सोळवंडे यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दै. पुढारी कार्यालयात प्रदान करण्यात आले.तेव्हा पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे मार्गदर्शन करीत होते.यावेळी ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण उपस्थीत होते. शरद महाजनी यांनी प्रास्ताविक केले.शहराध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.सागर गुजर यांनी आभार मानले.
शरद महाजनी यांनी पत्रकारितेमध्ये भरीव योगदान दिले आहे. त्यांनी दै. ऐक्य व दै. पुढारी येथे दीर्घकाळ सेवा केल्यानंतर सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. नुकत्याच सातारा पत्रकार संघाच्या निवडी झाल्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आई- वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी जानेवारी महिन्यात दोघांना आदर्श पत्रकार पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली होती. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व रोख रु.२,५००/- असे होते. आदेश खताळ व पद्माकर सोळवंडे यांची निवड करण्यात आल्याने मान्यवरांनी कौतुक केले.दोन्ही पत्रकार सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांवर विपुल लेखन करत आहेत.सदरच्या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील पत्रकार उपस्थीत होते.