अनिल वीर सातारा : येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय यांच्यावतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले .प्रसिद्ध व्याख्याते व विचारवंत प्राध्यापक श्रीधर साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले .यावेळी साहित्यिक डॉ. राजेंद्र माने अध्यक्षस्थानी होते.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुनीता उत्तेकर, उपाध्यक्ष प्राचार्य प्रमोदिनी मंडपे, कार्यवाह सुनीता कदम, संचालक डॉ.अनिमिष चव्हाण उपस्थित होते.
ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार सौ. राजश्री शहा यांनी अनुवाद केलेल्या व्हाईट टॉर्चर या ग्रंथास तर सौ सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार कवी अमोल अहेर शिव पुणे यांच्या अंतरीचा कॅनव्हास या कवितासंग्रहास प्रदान करण्यात आला. त्याचवेळी मोहन काळे मुंबई यांच्या एकदा आपणच व्हावे मोर आणि सौ भारती धनवे मंगळवेढा यांच्या दर्शन मात्रे या ग्रंथास उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.याच कार्यक्रमात साताऱ्यात शहरातील शुभांगी दळवी,ऍड.संगीता केंजळे डॉक्टर आदिती काळमेख आणि आनंदा ननावरे या साहित्यिकांना प्रेरणा पुरस्कारांनी गौरवाकिंत करण्यात आले .