पोलीस निरीक्षक निलेश तांबे विशेष सेवापदकाने सन्मानित  

0

स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सन्मान

सातारा / प्रतिनिधी : गडचिरोली येथे नक्षलग्रस्त क्षेत्रात अडीच वर्षांपक्षा जास्त काळ उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना पोलीस महासंचालकांतर्गत विशेष सेवा पद्धती जाहीर करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात तांबे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह सातारा तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नीलेश तांबे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांचा पोलीस महासंचालकांच्या पदकप्राप्त अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे विशेष सेवापदक जाहीर करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथे ‘दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून तेथील नागरिकांना वेगवेगळ्या योजना मिळवण्यासाठी ही योजना सुरू केली. त्याचा चांगला फायदा स्थानिक राहीवाशांना झाला होता.

या उपक्रमामध्ये निलेश तांबे यांनी बहुमत योगदान दिले होते. या कामगिरीबद्दल त्यांना पदक जाहीर झाल्याचे स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात पोलीस अधीक्षक समीर शेख प्रदान केले. गेल्या तीन महिन्यांपासून श्री तांबे हे सातारा तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळत आहेत. या कालावधीत उल्लेखनीय कामकाज केले आहे. गुन्ह्यांचा निपटारा व योजनांच्या अंमलबजावणीमध्ये विशेष योगदान दिले आहे. या गौरवाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here