अनिल वीर सातारा : तक्षशिला ज्ञान केंद्र इस्लामपूरचे अध्यक्ष सेवानिवृत्त गट विकास अधिकारी प्रकाश कृष्णाजी कांबळे यांचे वयांच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,पुतणे असा परिवार आहे.
विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीमध्ये प्रकाश कांबळे सक्रिय कार्यरत होते.प्रशासकीय सेवेमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कोकण विभागात ते कार्यरत राहिले. सेवानिवृत्त झाल्यानंतर इस्लामपूर येथे तक्षशिला न्यान केंद्र या महाबुद्ध विहार उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे .
तसेच कोकणात प्रशासकीय सेवेत काम करत असताना माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक उभारणीमध्येही त्यांचे मोठे योगदान आहे. आंबेडकरी घराण्याची त्यांची जवळीक होती. बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक, चिकित्सक, समीक्षक होते आणि आंबेडकरी चळवळीतील युवकांना ते मार्गदर्शक होते. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात ही त्यांचा सहभाग होता. सामाजिक चळवळीत अनेक विषयावर त्यांनी प्रखरपणे व्याख्यान दिलेली आहेत.