सातारा : प्रजासत्ताक दिन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी,मान्यवरांनी डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भन्ते दिंपकरजी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडला. बी.एल.माने यांनी प्रस्ताविकेचे वाचन पुढे करून सामुदायिकपणे म्हणण्यात आले. यावेळी जे.डी.कांबळे, विलास कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने,कार्यालयीन प्रमुख दिलीप फणसे व त्यांची कार्यकारिणी,धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे,कोषाध्यक्ष विकास तोडकर,संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे,सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे कार्यकर्ते, राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ, उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर,आनंद वाघमारे, मार्गदर्शक मधुसूदन काळे,अंकुश धाइंजे,अशोक भोसले,अशोक बनसोडे,शाहिर यशवंत भाले, पी.टी.कांबळे, घोडके, अनिल वीर आदी संविधान प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.
प्रजासत्ताकदिन अर्थात,२६ जानेवारी होय.याच दिवशी २६ जानेवारी १९५० रोजी म्हणजेच ७३ वर्षांपूर्वी भारताने भारतीय संविधानाची अंमलबजावणी नुसार भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केला होता.तेव्हा चला संविधान साक्षर होवून आपले हक्क जाणूया.आणी लोकशाही फक्त कागदावर व मतदानापुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष उपभोग घेवूया. हे शक्य तेव्हाच आहे , “संविधान” रूपी चावीने आधिकाराने जीवन जगू. आणी भारताची लोकशाही मजबूत करण्यात एक एक पाऊल पुढे टाकूया.