सातारा/आनिल वीर : तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंती उत्साहाचा कार्यक्रम प्रतापसिंह नगर येथील भन्ते चंद्रमणी बुद्ध विहारांमध्ये साजरा करण्यात आला.यावेळी अनेक धम्म बांधव बुद्ध विहारात उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले,”पंचशील आचरणात आणले तर मानवाचे आयुष्य सुखमय होईल.”
यावेळी भंतेचंद्र बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष विक्रम बोकेफोड, उपसरपंच कांता कांबळे, हरिचंद्र वाघमारे, सचिन ओव्हाळ, लक्ष्मीताई ओव्हाळ, भागाताई ओव्हाळ, स्वप्निल हराळ, दाबू घोडेस्वार, किरण ओव्हाळ, अन्यथा ओव्हाळ, करुणा ओव्हाळ इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
” महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध हे शाक्य कुळातील क्षत्रिय राजा शुद्धोधन व महामाया यांच्या पोटी जन्म घेऊन राजकुमाराने दुःखाचे कारण शोधलं आणि दुःखाचे कारण पंचशील होय. जर पंचशील म्हणजेच.. कोणत्याही जीव प्राण्याची हत्या न करणे, चोरी न करणे , व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे व मद्यपान न करणे. याचे पालन करण्यास सांगितले.” असेही ओव्हाळ यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आयोजन नवनिर्मिती मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल गव्हाळे यांनी केले. संध्याकाळी कॅन्डल मार्च काढून बुद्धांना वंदना करण्यात आले.
अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खीरदान करण्यात आले.तसेच वसंत ओव्हाळ यांच्या परिवाराकडून मोठ्या प्रमाणात खीर वाटप करण्यात आले.