प्रतापसिंह महाराज उद्यानाची दुरावस्था, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आंदोलनाचा  ईशारा

0

महाबळेश्वर प्रतिनिधी: महाबळेश्वर नगरीचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचे आठवे वंशज, छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या २३२व्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मात्र, याचवेळी शहरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यानाची दुरावस्था लक्षवेधी बनली आहे.

हे उद्यान गेले अनेक वर्ष वनविभागाच्या ताब्यात असून, लाखो पर्यटक दरवर्षी येथे भेट देऊन प्रवेश शुल्क भरतात. तरीही, उद्यानातील छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे स्मारक, मुख्य दोन्ही प्रवेशद्वार आणि उद्यान परिसर प्राण्यांचे अवशेष व वनस्पती संग्रहालय यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने या मुद्द्यावर तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. जर लवकरच या दुरावस्थेवर उपाययोजना करण्यात आली नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या स्मारकाची ही अवस्था पाहून शहरातील नागरिकांमध्येही तीव्र असंतोष आहे. त्यांनीही प्रशासनाकडे याबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here