प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शहिद दिनानिमित्त आदरांजली अर्पण

0

सातारा : येथील ऐतिहासिक प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला. शहीद दिनाचे औचित्य साधून शहीद भगतसिंग स्मृती समितीचे विनायक आफळे यांचे व्याख्यान झाले.

     “भगतसिंगांचे आयुष्यातील जालीयनवला बाग हत्त्याकांड, लाला लाजपत राय यांचेवरील लाठीहल्ला,सॅंडर्स वध, असेंब्लीतील बॉम्ब सफोट, जेलमधील अन्नत्याग सत्त्याग्रह, अस्पृश्यताविरोधी विचार आणि आचार,फाशी जातानाचे प्रसंग सांगून त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्यांची आठवण कायम ठेवली पाहिजे.”असे विनायक आफळे यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.

      शाळेचे समन्वयक कांबळे सर यांनी भगतसिंगांचा जन्म, बलापण आणि देशासाठी केलेल्या सर्वोच त्याग सांगून त्यानी केलेल्या त्यागाची आठवण ठेऊन देशाच्या प्रगतीसाठी चांगले शिक्षण घेऊन अध्ययनार्थीनी प्रगती करावी. असे सांगितले.संजीव बोन्डे यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि मुलांची कर्तव्ये याबाबत सविस्तरपणे विवेचन केले.गायत्री पवार यांनी सूत्रसंचालन केले.महेश घाडगे यांनी आभारप्रदर्शन केले.प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाबरोबरच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

     यावेळी शिरीष जंगम व अनिल वीर यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची प्रतिमा आणि त्यांच्या जीवनावरील पुस्तके शाळेस भेट देण्यात आली.सदरच्या कार्यक्रमास प्रदीप कुचेकर, प्रतीक्षा गुरव, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अध्ययनार्थी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here