जिल्हास्तरीय भारतीय बौद्ध महासभेची मासिक सभा उत्साहात !
सातारा : येथील भारतीय बौद्ध महासभेचे तत्कालीन तालुकाध्यक्ष कालकथीत एकनाथ एकनाथ फणसे यांनी पायी व सायकलद्वारे प्रवास करून गावोगावी धम्माचे रोपटे लावले होते.त्यामुळे आता सर्व सुविधा असल्याने धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वानी पुढे आले पाहिजे.असे आवाहन जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले.
येथील जिल्हा भारतीय बौद्ध सभा (पश्चिम विभागीय) सहविचार सभा सातारा (कोडोली) येथे मासिक सभेचे आयोजन जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आयोजीत करण्यात आले होते.तेव्हा प्रथमतः एकनाथ अंतु फणसे (गुरुजी) यांचा १७ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.तेव्हा मान्यवरांनी फणसे गुरुजी व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.संपूर्ण विधी सामुदायिक घेण्यात आला.अनेकांनी फणसे गुरुजींच्या जीवन चरित्रावर प्रकाश झोत टाकला.
दुसऱ्या सत्रातील सभेत जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे यांनी मागिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. वर्षावास मालिका सुरू करण्यासंदर्भात वाढ होण्यासंदर्भात चर्चा विनिमय करण्यात आला.आजीवन सभासदांची यादी करण्यात आली.कार्यरत बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक-शिक्षिका यांची नावे गॅझेट प्रसिद्धीसाठी सादर करण्यात आली .महाविहाराच्या देखभाल खर्चाबाबत चर्चा करण्यात आली. पुढील महिन्यातील नियोजनावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. संस्थेचे बँक खाते उडघडण्याकामी प्रत्येक पदाधिकारी यांनी सभेत आधार कार्ड,पॅन कार्ड व दोन फोटो घेऊन आले होते.काही पदावर असून आपल्या पदास न्याय देत नाहीत.त्यांच्यावर कारवाई नियमानुसार करण्यात येईल. महासभेच्या बाहेर टीका-टिप्पणी न करता समोरासमोर येऊन सकारात्मक चाचा केली पाहिजे. याशिवाय,अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा-विनिमय झाला.
यावेळी पश्चिम भागातील पाटण,कराड,जावली, महाबळेश्वर व सातारा तालुक्यातील अध्यक्ष, सरचिटणीस,कोषाध्यक्ष त्यांचे सहकारी व धम्मबांधव उपस्थित होते.त्यामध्ये प्रामुख्याने विजय माने(कराड),खरात(जावली),कांबळे (पाचगणी),आनंदा गुजर (पाटण),उत्तम पवार (पाटण), सरचिटणीस सातपुते (वाई), सरचिटणीस अनिल सकपाळ (महाबळेश्वर),पोपट यादव,आप्पा अडसुळे (कराड),वामन गायकवाड,नंदकुमार काळे, विकास तोडकर,कुमार सुर्वे, दिलीप सावंत,जिल्हा व सातारा तालुक्यातील पदाधिकारी व बौद्धाचार्य,आजी-माजी पदाधिकारी, दिनेश माने, अनिल वीर आदी धम्मबांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते. फणसे कुटुंबीयांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्नेहभोजनाचा आनंदही उपासिकांनी लुटला.