पाटण : प्रतिकूल परिस्थिवर मात करून भोळे परिवाराने धम्मानुसार सुसंस्कृत असे कुटुंब निर्माण केले.असे प्रतिपादन बबन कांबळे यांनी केले. अर्बन बँकेचे संचालक आनंदा (आबासाहेब) भोळे यांच्या पत्नी रेखाताई भोळे यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात पाटण येथे झालेल्या आदरांजलीपर कार्यक्रमात माजी पंचायत समितीचे सदस्य बबन कांबळे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आनंदा गुजर होते.
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस दिलीप फणसे म्हणाले,”कुशल कर्माचा परिपाक भोळे कुटुंबात पहावयास मिळतो.” बंधुत्व धम्मरत्न मिलिंद कांबळे म्हणाले,”मायेची पाखरे ऍड.राहुल व संदीप ही भावंडे पोरखी झाली असली तरी यशस्वीपणे समाजात कार्यरत आहेत.” केंद्रीय शिक्षक भागवत भोसले म्हणाले,”जीवनात अघटित घटना घडत असतात. मात्र,धम्माने दुःखावर मात करता येते.” अशोक देवकांत म्हणाले, “भोळे मॅडमनी संसार सुरळीत करून गेलेल्या आहेत.सर्व काही ऐश्वर्य व संपत्ती परिवारास त्यांच्यामुळेच प्राप्त झाली आहे.” बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष भीमराव दाभाडे म्हणाले, “मानवाने अहंकार सोडून दिला पाहिजे. आपले समाजातील स्थान निर्माण करण्यासाठी आई-वडील व समाजातील महनीय व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.”
यावेळी आनंदा गुजरसह आरपीआयचे प्राणलाल माने,जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे उत्तम पवार (पाटण) व गायकवाड गुरुजी (कराड), बौद्धाचार्य विजय भंडारे व गौतम माने (तारळे विभाग), आनंदा भोळे,त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्ममित्र शशिकांत देवकांत आदींनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली.बौद्धाचार्य विजयकुमार गायकवाड यांनी संपूर्ण विधी पार पाडला.सदरच्या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे नंदकुमार काळे विद्याधर गायकवाड (सातारा), नंदकुमार भोळे,ऍड.विलास वहागावकर, ऍड.विजयानंद कांबळे, ऍड.संदीप कांबळे, महादेव मोरे,बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते जगधनी अण्णा, माजी केंद्रप्रमुख राजाराम भंडारे, राहुल रोकडे,चंद्रकांत कांबळे, विजय थोरवडे,संपूर्ण भोळे, माने,शिरसाट,कांबळे व गायकवाड परिवार, मिलिंद कांबळे (बापू),अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यावर, पत्रकार, कार्यकर्ते, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.