सविधानप्रेमीनी एकजूट करावी : गवई
सातारा : सामाजीक,धार्मिक, राजकीय,सांस्कृतिक आदी क्षेत्रात सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रसारमाध्यमाद्वारे प्रचार-प्रसार होण्यास मदत होते.असे गौरवोद्गार भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ट नेते भीमराव परिहार यांनी काढले.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे पोलीस परेड ग्राऊंड मेढा,ता. जावली येथे बौद्ध धम्मपरिषद, दीक्षा समारंभ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अशा संयुक्तिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा जिल्ह्यातील ज्येष्ट पत्रकार अनिल वीर यांना राष्ट्रीय सचिव जगदीश गवई यांच्या हस्ते पत्रकार गौरवपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.तेव्हा परिहार वीर यांच्याबद्धल भरभरून बोलत होते.प्रारंभी, डॉ. भीमराव आंबेडकर,गवई व सोबत असलेले मान्यवर,श्रामनेर आदींचे नियोजनपूर्वक फुलांची उधळण करीत स्वागत केले.समता सैनिक दलाने मानवंदना देण्याबरोबरच शिस्तबद्ध नियोजन केले होते.
राष्ट्रीय सचिव गवई म्हणाले, “ज्ञानज्योती यांना म.फुलेंनी घडविले तर बाबासाहेबांचे गुरू म.फुले होते.संविधान हाच खरा ग्रंथ असून समाजातील सर्व घटकांनी एकजूट ठेवली पाहिजे.” राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मोहन खरात होते. यावेळी राष्ट्रीय माजी सचिव नाथा ममता आगाणे, जिल्हाध्यक्ष सुदाम ढापरे (प.), महाविहार बांधकाम कमिटीचे अध्यक्ष व्ही.आर.थोरवडे,समता सैनिक दल ऑफिसर दादासाहेब भोसले,एस.एस.वानखेडे,वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे,जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड, जिल्हा युवा महासचिव सायली भोसले,जिल्हा उपाध्यक्ष किरण गायकवाड,योगेश कांबळे, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,संघटक गणेश भिसे, समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ,मनीषा खरात, काजल परिहार,भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष दिलीप फणसे, सरचिटणीस तानाजी बनसोडे, केंद्रीय शिक्षक भागवत भोसले, नंदकुमार काळे,विद्याधर गायकवाड,नंदकुमार भोळे,आप्पा अडसूळे,तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने (सातारा) याशिवाय, जिल्ह्यातील सर्वच तालुकाध्यक्ष व त्यांचे सहकारी,केंद्रीय शिक्षिका राजश्री मस्के,श्रामनेर उत्तम मस्के आदींची विशेष अशी उपस्थिती होती.वंचितचे तालुकाध्यक्ष प्रकाश सकपाळ यांनी प्रास्ताविक केले.भीमराव परिहार यांनी संपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.
सदरच्या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,अधिकारी,पदाधिकारी,कार्यकर्ते,उपासक-उपासिका यांच्यासह भारतीय बोध्द महासभा जिल्हा आजी-माजी पदाधिकारी,जावली तालुक्यातील सर्व पदाधिकारी बोध्दाचार्य, केद्रिंय शिक्षक, समता सैनिक व वंचित बुहजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, आंबेडकर कुटुंबाशी एकनिष्ठ असणारे सर्व श्रध्दा व शिलवान,संविधान प्रेमी व विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. याकामी,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मोहन खरात, कोषाध्यक्ष शिवराम कांबळे, सचिव कृष्णकांत सपकाळ,सर्व उपाध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी यांच्यसह वंचितचे पदाधिकारी आदींनी अथक असे परिश्रम घेतले.