सातारा/अनिल वीर : येथील श्रीमंत छ.प्रतापसिंह महाराज यांची समाधी बनारस याठिकाणी आहे.त्यामुळे त्यांच्या जयंतीस अभिवादन बनारसी येथे केले जाणार आहे.तेव्हा प्रसारमाध्यमांनी देशद्रोही कृत्य करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या विचारधारेवर प्रहार केला पाहिजे. असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव Dr. Vilas Kharat डॉ.विलास खरात यांनी केले.
येथील राजवाड्यावरील गांधी मैदानावर श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा छत्रपती क्रांती सेनेतर्फे आयोजीत करण्यात आली होती. तेव्हा डॉ.खरात मार्गदर्शन करीत होते.यावेळी वृषालीराजे भोसले, साहेबराव पवार,तुषार मोतलींग आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज-रोजनिशी व कागदपत्रे या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. संध्याकाळी ४ वाजता सुरू होणारा कार्यक्रम ६ नंतर सुरू झाला.रात्रौ पावणे दहा वाजता डॉ.खरात यांच्या भाषणाने सांगता झाली.दरम्यान,अनेक वक्त्यांनी अभ्यासपूर्ण व सत्य इतिहास सांगुन खऱ्या अर्थाने समाजजागृत्ती केली.सदरच्या सभेस पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत व नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.