फलटण : भारतीय पोलीस दलामध्ये उत्कृष्ट तपास कामाची उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकाऱ्याला “केद्रीय गृहमंत्री दक्षता पदक” बहाल करुन त्याचा भारत सरकारच्या वतीने सन्मान करण्यात येतो.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी “केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक” सन-२०२४ हे पदक फलटणचे कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल रावसाहेब धस यांना केंद्र सरकारने जाहिर केले आहे.
सदरचे पदक हे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट तपासाचे कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला हे पदक दिले जाते.
राहुल धस यांचेबरोबर महाराष्ट्रातील एकूण ११ पोलीस अधिकारी यांना सदरचे पदक देवून भारत सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.
सदरचे पदक राहुल रावसाहेब धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांना मिळाले बाबत सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व जिल्हयातील तसेच फलटण उपविभागतील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राहुल धस यांचे अभिनंदन केले आहे.