अनिल वीर सातारा : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी संपादित केलेल्या, ‘फुले – आंबेडकरी समकालीन राजकारण ‘ या पुस्तकाचे प्रकाशन येथील पाठक हॉलमध्ये ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते.यावेळी लेखक प्रा. गौतमीपुत्र कांबळे (सांगली), भरत शेळके, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे ( मुंबई ) आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय व मूळ राजकीय विचार तसेच त्यांनी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षांचे जाहीरनामे तसेच त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाबाबत बाबासाहेबांनी भारतीय जनतेस लिहिलेले खुल्या पत्राचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे. बाबासाहेबांच्या हयातीनंतर स्थापन झालेल्या या पक्षाचे भारतीय राजकारणातील यशापयश व भवितव्य याचा उहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे.
सदरच्या कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ॲड.हौसेराव धुमाळ, कोषाध्यक्ष केशवराव कदम, सहकार्यवाह अनिल बनसोडे, विश्वस्त प्रा. प्रशांत साळवे,विश्वस्त,सतीश कुलकर्णी,नारायण जावलीकर, प्रियांका ,ऍड.विलास वाहागावकर,अशोक कांबळे, अमर गायकवाड,जयंत उथळे, अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,साहित्यिक व कार्यकर्ते उपस्थित होते.