अनिल वीर सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील महाराष्ट्र बँकेत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथम मान्यवरांनी प्रकाशाचे प्रतिक मेणबत्ती प्रज्वलित केली. सुगंधाचे प्रतिक अगरबत्ती लावण्यात आली. डेप्युटी झोनल मॅनेजर महेश कुर्लेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सविस्तर भाषण केले.यावेळी श्रीकृष्ण झेले,श्रीराम नाना व मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.सदरच्या कार्यक्रमास दादासाहेब केंगार, बी. एल. माने व बाळासाहेब करे है निवॄत्त झालेले अधिकारी व झोनल आॅफिसचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि बोतालजी उपसस्थित होते. कार्यक्रमाचा संपूर्ण विधी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक भागवत भोसले यांनी पार पाडला.