सातारा : बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे जावली तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तात्या गाडे व सरचिटणीस भीमराव परिहार यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बंधुत्व धम्म प्रचार-प्रसार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
अनेक वर्षे झाली गाडे व परिहार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धम्माचे कार्य अविरतपणे चालु ठेवलेले आहे. यापूर्वी,मिलिंद कांबळे,अनिल कांबळे,यशवंत अडसूळे,भागवत भोसले,दिलीप फणसे, आबासाहेब दणाने, विद्याधर गायकवाड,डॉ.भीमराव यादव, नंदकुमार काळे,गौतम माने, भानुदास सावंत,गणपत भंडारे, महादेव मोरे आदी पदाधिकारी – कार्यकर्त्यांना धम्मचळवळतील योगदानाबद्धल सन्मानीत करण्यात आलेले आहे.२ वर्षांपूर्वी डॉ.ऍड.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार व्ही.आर.थोरवडे यांना प्रदान करण्यात आलेला होता.तरीही गतवर्षी मुख्य असणारा बंधुत्व पुरस्कार थोरवडेसाहेब यांना वितरित करण्यात आलेला आहे. सन १९९१ साली डॉ.आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष व म.फुले स्मृती शताब्दी वर्ष होते.तेव्हाच स्वतः संस्थापक अनिल वीर यांनी कॉलेजमध्ये शिकत असतानाच प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरस्कार सुरू केलेले आहेत.
भारतीय बौद्ध महासभेचे राज्याध्यक्ष भिकाजी कांबळे व जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे यांच्या हस्ते गाडे व परिहार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड यांनी केले. पुरस्कारप्राप्त गाडे – परिहार म्हणाले,”मिळालेला पुरस्कार हा काटेरी मुगुट आहे. केलेल्या कार्याची दखल घेऊन आम्ही पात्र ठरलो असलो तरी यापुढे अधिकाधिक धम्म कार्य करण्याची नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.मिळालेला पुरस्कार धम्मचळ यास अर्पित करीत आहोत.”
सदरच्या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे (पाटण),मिलिंदबापू कांबळे, संस्कार विभाग उपाध्यक्ष दगडू तांदळे, महिला विभागीय उपाध्यक्षा कमल कांबळे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, प्रकाश सपकाळ, भागवत भोसले,बाळासाहेब जाधव, योगेश कांबळे, नंदकुमार काळे,दिलीप फणसे,प्रकाश तासगावकर,द्राक्षा खंडकर,सौ. कल्पना कांबळे, सुधाकर काकडे, श्रीरंग वाघमारे,आप्पा अडसूळे, भारतीय बौद्ध महासभा, शाखा- जावली तालुका अंतर्गत मेढा, केळघर, कुडाळ,करहर व बामणोली विभागाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह कोषाध्यक्ष सिताराम कांबळे, उपाध्यक्ष मोहन खरात, कृष्णकांत सपकाळ, अनिताताई कांबळे तसेच विभागीय अध्यक्ष विजय सपकाळ,अनिल जगताप, संपतराव सपकाळ,प्रकाश कांबळे,उत्तम कांबळे,सुशिल वाघमारे (महाराष्ट्र कोषाध्यक्ष), श्यामराव कांबळे (महाराष्ट्र सहसचिव), स्वाती गायकवाड (सचिव मुंबई प्रदेश),अलका दिपंकर(केद्रिय शिक्षिका),सुनिल सपकाळ(केंद्रीय शिक्षक) दादासाहेब भोसले(संरक्षण उपाध्यक्ष), भिमराव गायकवाड, आप्पा खुंटे(खंडाळा अध्यक्ष), सोपानराव जगताप,मेघा खरात, भिमराव सोनावणे,काशिनाथ गाडे, संपत कांबळे, शिवाजी चव्हाण,बौद्ध विकास मंडळ, संघमित्रा महिला मडळ आदी मंडळाचे पदाधिकारी,अरुण कांबळे व सभासद करंदोशी, संजय जाधव (भिवडी),सिताराम कांबळे (आंबेघर),पंकज गायकवाड (सरताळे),योगेश कांबळे(मेढा),उत्तम गायकवाड (इंदवली),सोपानराव जगताप (सायगाव),सुरज परिहार (बिभवी),दिपक सपकाळ (पानस), विश्व रत्न एकता मित्र मंडळ गांजे, किरण सपकाळ (मोरघर),दिपक सपकाळ ( मोरघर),विजय कदम(गोगवे), राहूल परिहार(बिभवी), एकनाथ रोकडे (सोनगाव), विजय गायकवाड(इंदवली),मानसिंग खरात, प्रशांत चव्हाण (ओझरे) , संपतराव सपकाळ (कावडी), आनंद जाधव (मेढा),बाळकृष्ण चव्हाण(ओझरे), नितीन कांबळे (करंजे), सिध्दार्थ परिहार (बिभवी), शिवाजी चव्हाण ( केळघर),भिमराव रोकडे (बामणोली),संजय गायकवाड (इंदवली),भाऊसो.भोसले (वालुथ) आदी उपासक – उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.