सातारा : ज्येष्ट पत्रकार व वृत्तसंपादक जितेंद्र जगताप यांना बंधुत्व पत्रकाररत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
माधव जाधव यांनी स्वागत केले.अरुण धनावडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.संस्थापक अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले.शरद निकम यांनी आभार मानले. बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे पत्रकार क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना गौरविण्यात आलेले आहे.त्यामध्ये संपादक घनश्याम छाबडा व देसाई, ऍड.सुनील कांबळे, वासुदेव चोचे,संदीप गाढवे आदींना गौरविण्यात आलेले आहे.जितेंद्र जगताप यांनी पत्रकार क्षेत्रात शुन्यातून विश्व निर्माण केलेले आहे. त्यांनी कर्मचारी ते उपसंपादक अशी झेप घेतली होती.टप्प्या – टप्प्यातून पदोन्नती घेत घेत त्यांनी उपसंपादक पदापर्यंत मजल मारल्यानंतर सध्या वृत्तसंपादक म्हणून यशस्वी अशी वाटचाल करीत आहेत. याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.