सातारा/अनिल वीर : ५३६ संस्थाने होती.येथील संस्थान ताराराणी यांनी राखले.त्यामुळेच स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले.छत्रपतींचे विचार असल्याने बंधुत्व तुटले नाही.असे प्रतिपादन अरबाज शेख व सचिन खोपडे यांनी केले.
येथील तख्ताचा वाडा,गुरुवार बागेत छ.शाहु महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.तेव्हा इतिहास अभ्यासक सचिन खोपडे यांनी “छ.शाहु महाराज व मराठा साम्राज्यविस्तार” या विषयांवर सविस्तर व्याख्यान दिले.
सचिन खोपडे म्हणाले,”छ.शाहु महाराज,छ. शिवराय व छ.संभाजीराजे यांच्या विचारावरच धर्म-पँथ भेद झाला नाही.पुसेसावळीप्रकरण व्यतिरिक्त जिल्ह्यात छत्रपतींच्या विचारांचा वारसा लाभला. छ.शिवराय हे मस्जिद बांधा म्हणणारे एकमेव राजे होते.” यावेळी चॅनेलचे सादीकभाई यांचेही मनोगत झाले.यशवन्त घोरपडे यांनी स्वागत केले. डीपीआयचे जिल्हाध्यक्ष हृषीकेश गायकवाड व अरबाज शेख यांनी अनिल वीर यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण केले होते.मात्र,इतिहास अभ्यासकांचे विचार महत्वाचे असल्याने इतरांना संधी दिली नाही.प्रथमतः छ. शाहु महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सचिन खोपडे व इतरांनी अभिवादन केले.सदरच्या कार्यक्रमास पत्रिकेतील नावापैकी ठराविकच उपस्थित होते.इतर नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.