सातारा : सततच्या पावसाचा खटाव तालुक्यात कांदा रोपांना फटका बसला आहे. पाऊस पूर्ण थांबण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. या हंगामात पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तीन ते चार वेळा कांदा बियाणे टाकून रोपे तयार करावे लागले आहेत.
दरम्यान, सध्या बाजारात कांद्याचे भाव समाधानकारक असल्याने रब्बीच्या कांद्याला चांगले दर मिळतील,
या अपेक्षेने या हंगामातही रब्बी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. खटाव, खातगुण, भांडेवाडी, लोणी व भोसरे भागात कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, लागवडीचा वेग वाढण्यासाठी पाऊस पूर्ण थांबण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
पुरंदरमध्ये पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान
रब्बी हंगामातील कांदा महत्त्वाचे पीक असल्याने दरवर्षी तालुका कांदा उत्पादनात अग्रेसर असतो. मागील वर्षी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु बाजारभावाअभावी शेतकऱ्यांनी कांदा वखारीत साठवून ठेवला. अनेक महिने बाजारभावाची प्रतीक्षा करताना कांदा खराब झाला.
‘करप्या’च्या प्रादुर्भावाने तळेगाव बाजार परिसरात कांद्याचे नुकसान
मात्र, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने व कांद्याला चांगला दर असल्याने शेतकरी कांदा लागवडीचे नियोजन करू लागला आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकऱ्यांनी खूप कष्टाने कांदा जगवला होता; पण दर मिळाला नाही. यंदा कांदा भावात वाढ झाली आहे; पण शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नाही, त्यामुळे केवळ व्यापाऱ्यांचीच चांदी असल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.
धनाजी काटकर, प्रगतिशील शेतकरी, काटकरवाडीअलीकडच्या काळात कांदा पिकाच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. कांदा बियाणे एकरी तीन किलो लागते. या भागात नाशिक गरवा रोपांना चांगली मागणी आहे. यावर्षी कांदा लागवडीसाठी ट्रॅक्टर, मजुरी, खत, शेणखत, शेतबांधणी असा एकरी ८० हजार रुपये खर्च येत आहे.