सातारा/अनिल वीर : The Buddhist Society of India दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेतर्फे बहुले, ता.पाटण येथे साप्ताहिक धम्म जागृती कार्यक्रम वर्षावास मालिकेनुसार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कराड तालुका सचिव यशवंत (आप्पा) अडसुळे, संघटक नंदकुमार भोळे व डॉ.संघर्षाताई घोलप यांनी मार्गदर्शन केले भोळे यांनी “आपल्या अनमोल वेळेचं महत्त्व पटवून दिले.धम्मज्ञान एकाग्रतेने ग्रहण करून अनुकरण केले पाहिजे.”असे विविध उदाहनाद्वारे स्पष्ट केले.डॉ.घोलप यांनी बुद्धांची धम्म शिले अर्थात पंचशील व त्याचे आयुष्यामध्ये असणारे महत्व अतिशय सुंदर व सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितल. सदरच्या कार्यक्रमास उपासक, उपासिका,बालक,बालिका,युवक व युवती बहुसंख्येने उपस्थित होत्या.