*स्वराज्याचे सुराज्य करुया.*
सातारा : सर्वसामाज घटकांना बाबासाहेब यांचे कार्य उत्तुंग असल्याचे ज्ञात आहे.तरीही त्यांचे चरित्र अधिकाधिक आभ्यासून समाजजागृती करण्यासाठी पुढे आले पाहिजे.असे आवाहन लोकमंगल समूहाचे सर्वेसर्वा शिरीष चिटणीस यांनी केले.
नागेवाडी-कुशी,ता.सातारा येथील लोकमंगल हायस्कुलमध्ये महापरिनिर्वाण दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.तेव्हा सांगता समारोहप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिरीष चिटणीस मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.विद्या बाबर होत्या. चिटणीस म्हणाले, “महापुरुषांच्या विचारानुसार सौहार्दपूर्ण समाज निर्माण होत आहे.तेव्हा आधुनिक समाजनिर्मिसाठी सर्वच समाजघटकांनी कार्यरत असले पाहिजे.”
बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर म्हणाले,”महापुरुषांनी त्यागातून समाजजागृती केली होती.तेव्हा त्यांच्या विचारान्वये वाटचाल केली पाहिजे.परंतु आताचे काही लोकप्रतिनिधी अभद्र भाषा वापरून पुनःपुन्हा सावरण्याचे प्रयत्न करताना आढळून येत आहेत.कुठे घेऊन राष्ट्रास जात आहेत? विकासकामापेक्षा निरर्थक मुद्द्यावर सर्वत्र खमंग अशी चर्चा असते.पारतंत्र्यात असल्यासारखे काही मूठभर लोक आपले काम करण्यात मश्गुल आहेत.तेव्हा मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठीही सर्वच समाजघटकांनी योगदान दिले पाहिजे.”
रामचंद्र जाधव म्हणाले, “महापुरुषांनी दिलेल्या विचारानुसार मार्गक्रमण केले पाहिजे. तरच समाजजागृतीसह सर्व क्षेत्रात विकास करण्यास साह्य होईल.” यावेळी कु. रोहिणी सावंत,मेघना भोसले,श्रेया भोसले,श्रेया सावंत,अनुष्का चिवे,सोहम सावंत,गुरव आदींनी आपापल्या मनोगतात बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.
शशिकांत जमदाडे यांनी स्वागत केले.कु.श्रेया जाधव व कु.वैष्णवी सावंत यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी, मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.सदरच्या कार्यक्रमास शशिकांत जाधव,दत्तात्रय सावंत,भगवान जाधव,राहुल घोडके,रमेश महामुलकर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व अध्ययनार्थी उपस्थित होते.