बाबासाहेबांच्या विचारानुसार होलार समाज स्तुत्य उपक्रम राबवतात : प्राचार्य अरुण गाडे

0

सातारा : सुमारे ३० वर्षांपासून होलार समाज बाबासाहेबांच्या विचारानुसार नानाप्रकारे विविध उपक्रम राबवत आहेत.असे गौरवोद्गार प्राचार्य अरुण गाडे यांनी काढले.

   येथील जिल्हा अखिल भारतीय होलार समाज यांच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजवाडा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.तेव्हा प्राचार्य गाडे मार्गदर्शन करीत होते.यावेळी डॉ.आंबेडकर व भ.बुद्ध यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. याशिवाय,दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी दरवर्षीप्रमाणे मोफत सरबत वाटप करण्यात आले.

     सदरच्या कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,पँथरचे जिल्हाध्यक्ष अरविंद गाडे, संविधान लोकजागर परिषदेचे संघटक अनिल वीर, होलार समाजाचे ज्येष्ट नेते दादासाहेब केंगार,प्रा.डॉ.आबासाहेब उमाप,वक्ते आदिनाथ बिराजे, शहापुरचे उपसरपंच राजेंद्र सकटे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते  उपस्थिती होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासो शिवाजी आवटे,उपाध्यक्ष मंगेश मोहन नामदास, प्रमुख सल्लागार दिलीप चौगुले आदींनी स्वागत केले.मानसिंग शेलार,आयुष्य शेलार, रामचंद्र गेजगे,संतोष शेलार, वैष्णव नामदास,शरद शेलार करवले मनोज जाधव, गणेश खांडेकर, हनुमंत खांडेकर, दीपक आवटे, विशाल आवटे आदींनी अथक असे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here