अनिल वीर सातारा : कण्हेर (गणेशनगर),ता. सातारा येथील सुनील बाबुराव वाघमळे यांना बालगंधर्व स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
संगीत क्षेत्रातील अनुभव वयाच्या १० व्या वर्षापासून सुनील वाघमळे यांना आहे.त्यांनी मृदुंग व तबला याचे शिक्षण गुरुवर्य कै. गणपत बुवा घागरे (जोतिबाचीवाडी) यांचेकडे घेतले होते. पुढे मदन कदम व शाम सुतार यांचे मार्गदर्शन मिळाले.वारकरी सांप्रदाय तालुका सातारा व जावली या विभागामध्ये अनेक कीर्तन व भजन यांना साथ संगत दिली.
तसेच अनेक नाटक व एकांकिका यांना संगीत संयोजन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळामध्ये पुरस्कार निवड समिती मध्ये ३ वर्ष सदस्य म्हणून काम पाहिले आहे. दूरचित्रवाणी व आकाशवाणीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाला साथ संगत देत आहेत.याबद्धल वाघमळे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.