सातारा : बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सर्वत्र देशभर आंदोलन सुरू आहेत. महाड येथेही चवदार तळे येथे आंदोलन पार पडले असून अजूनही ठिकठिकाणी होत आहेत.याचाच परिपाक म्हणुन कोरेगाव येथे तहसीलदार कार्यालयासमोर सोमवार दि.२४ रोजी सकाळी ११ वा. रिपब्लिकन सेना व तत्सम संघटनांच्यावतीने निदर्शने आंदोलन छेडण्यात येणार आहे.
बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राम्हणांनच्या ताब्यात असल्याने ते त्यांच्या ताब्यातून मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात मिळावे. या करिता जे बुद्धगया येथे चालू असलेल्या विश्व व्यापी आंदोलनास पाठींबा देणे करीता रिपब्लिकन सेना व भारतीय बौद्धमहासभा यांच्यावतीने होणाऱ्या आंदोलनास तालूक्यातील सर्व बौद्ध आनुयायांनी,महिला, पुरूष, युवक व युवती यांनी बहुसंख्येने वेळेवर उपस्थीत रहावे. असे आवाहन निमंत्रक सती माने
(रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष, कोरेगाव) व बाळासाहेब जाधव (भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा कोषाध्यक्ष पू.) यांनी केले आहे.