बुद्धविचार हे सिद्ध,वारकरी आदी परंपरेत आढळतात : ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर

0

अनिल वीर सातारा : बुद्ध विचार उर्जेसारखा असल्याने सिद्ध,वारकरी आदी परंपरेत आढळुन येत आहे.असे प्रतिपादन ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर यांनी केले. भिमाबाई आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे धम्मसंगिनी अर्थात, धम्मपरिषदेचे आयोजन येथील संत गाडगे महाराज सामाजिक संस्था सांस्कृतिक भवन कामाठीपुरा,गोडोली येथे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पार्थ पोळके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.तेव्हा उद्घाटनपर ह.भ.प. ओLज्ञानेश्वर बंडगर (पंढरपूर) मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,”अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध वारसा आहे. वारकरी संप्रदाय व धम्म यात साम्य आहे. बौद्ध धर्मात समतेचा व बंधुत्वाचा वारसा आहे. समतेचा विचार असल्याने संप्रदाय टाकलेला आहे. सिद्धामध्ये पूर्वाश्रमीचे बौद्ध होते.सिद्धाने विषमता नष्ट केली. तेच तत्वज्ञान बौद्ध धर्मात आहे. भिक्खूमध्ये संन्यास अपरिहार्य आहे.याऊलट सीद्धमध्ये आढळून येते. वारकरी व सत्यशोधक सर्व परंपरेत आहे. संत गाडगेबाबा यांचे चरित्र प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले आहे.त्यात प्रबोधनकार म्हणतात,”संत गाडगेबाबा चालु काळातील सिद्धार्थ आहेत.”

“बाबासाहेबांचे धर्मान्तर/नवयान” या विषयावर डॉ.प्रदीप गोखले (पुणे) यांचे व्याख्यान झाले.ते म्हणाले,”महायान  तत्वज्ञानाचा पुरस्कार बौद्ध धर्माने केला आहे.त्यामुळे त्यांनी पाली तत्वज्ञानास गौणस्थान दिले. शून्यवादाला अनुसरून सारनाथसह बुद्धांनी धम्मविचार दिले.हिंदूंनी जात-पात मानणारा धर्म दिला होता.त्यास बाबासाहेब यांनी छेद देऊन स्वातंत्र्य,समता व बंधुता दिली.बुद्धीझम श्रेष्ठ आहे.त्यात सर्वच बुद्ध तत्वज्ञान आहे.त्यांनी विज्ञानवादी बौद्ध धर्म दिला.

बुद्ध विचार संघापूरता न ठेवता बाबासाहेबांनी समाजास दिला.तीन वेळा धम्मचक्र प्रवर्तन झाले असले तरी नवयान म्हणून बाबासाहेबांनी चौथे धम्मचक्र प्रवर्तन केले आहे. नैतिकमार्गाने मानवाने मार्गक्रमण केले पाहिजे.” अशा पद्धतीने सविस्तर माहिती कथन केली.

  स्त्रियांचे संघामध्ये प्रवेश या विषयावर धम्मसंगिनी रमा गोरख  म्हणाल्या,”म.ज्योतिबांच्या काळापासून बाबासाहेबापर्यंत अनेक महिला संघटन करीत असल्या तरी राजकीय वर्ग बनण्यास यश आले नाही.तेव्हा स्त्री वादाच्या नकारातून होकार व सकारात्मक बदल झाला पाहिजे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here