बुद्धांचा मध्यम मार्गाने धम्मचळवळ यशोशिखरावर जाईल : अशोक भालेराव

0

सातारा/अनिल वीर : निर्णय घेण्याची क्षमता स्वतःची असली पाहिजे.तरच न्याय मिळू शकेल. तेव्हा महापुरुष व समाजातील थोरांच्या विचारानुसार वाटचाल करून उत्तरोत्तर जिल्हा बुद्धांच्या मध्यम मार्गाने धम्मचळवळ भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून  यशोशिखरावर पोहचवूया.असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी केले.

    येथील मिलिंद सोसायटीच्या सभागृहात जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची मनोमिलन सहविचार सभा संपन्न झाली.तेव्हा अध्यक्षस्थानावरून जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव मार्गदर्शन करीत होते.

   यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुदाम ढापरे,भागवत भोसले, दिलीप यादव,सुनील सपकाळ, जगन्नाथ गायकवाड,पी.डी. साबळे,दयानंद शिलवंत, ऍड. विजयानंद कांबळे,बाळकृष्ण देसाई,अभिजित भालेराव आदींनी मनोगत व्यक्त केली. सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार, आजी-माजी पदाधिकारी, जिल्ह्यासह महाबळेश्वर तालुक्यातील महासभा,भीमक्रांती व वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते,उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या. सरचिटणीस दिलीप फणसे  यांनी प्रास्ताविक केले.सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.उपस्थितांनी प्रीतिभोजनाचा लाभ घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here