बुध येथील महिलांनी केले विधवा प्रथामुक्त गाव

0

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम :

खटाव तालुक्यातील  विधवा प्रथा मुक्त गाव होण्याचा मान बुध या गावाला मिळाला. महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत बुध व समृद्धी सामाजिक विकास संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बुध ग्रामपंचायत येथे विधवा मुक्ती कार्यक्रम उत्साहात साजरा झाला .या कार्यक्रमांमध्ये विधवांना सन्मानाने वागणूक देण्यात यावी असे आवाहन सरपंच सौ सुजाता बोराटे , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे ,ग्रामपंचायत सदस्य शारदा कचरे तसेच ग्रामविकास अधिकारी सीमा घाडगे यांच्या मार्फत आवाहन करण्यात आले . या कार्यक्रमांमध्ये सर्व हजर महिला कडून बुध हे गाव विधवा मुक्त करत आहोत अशी मान्यता घेण्यात आली यावेळी या निर्णयाला सर्व ग्रामस्थ महिला यांनी प्रतिज्ञा घेऊन सहमती दर्शवण्यात आली .आपण आपल्या गावात सद्वा विधवा हे भेद दूर करून आपले गाव विधवा मुक्त करत आहोत .यानंतर विधवांना बोलवून सुहासिनी द्वारे हळदी कुंकू लावून खना नारळाची ओटी भरून त्यांना सन्मानित करून आपले गाव विधवा मुक्त केले असे जाहीर केले . याचबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

 यावेळी महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या वेळी जय हिंद फाउंडेशन यांच्या प्रतिनिधी सौ.हेमलता फडतरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच बुधमधील महिलांना विधवा मुक्तीविषयी प्रबोधन करून मतदान घेतले असता शंभर टक्के महिलांनी हात उंचावून मतदान केले. जयहिंद फाउंडेशनच्या खटाव तालुकाध्यक्षा सौ. हेमलता किसन फडतरे यांनी तीन वेळा विधवा प्रथा मुक्त बुधचा जयघोष केला.  

 खटाव तालुका विधवा प्रथा मुक्त करण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तालुकावासियांची मदत गरजेची आहे, असे हेमलता फडतरे यांनी सांगितले.  यावेळी विजया नलवडे , रूक्मिणी आवळे यांची खणानारळांनी  ओटी भरली . यावेळी भारती जगदाळे , अनिता खोत , वासंती पोतदार , रेखा जगदाळे , चेतना मखरे , लक्ष्मी इंगळे , सुप्रिया शेंडे , पोलीस पाटील योगिता मेळावणे , प्रिती त्रिपुटे  , अरूणा बोराटे , राणी कुंभार , संध्या बोराटे , प्राजक्ता इंगळे , सारीका बागवडे , स्वागता सुतार , व गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या .   सौभाग्य अलंकार देऊन  महिलांचा सन्मान सरपंच सुजाता बोराटे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here