बोरगाव ठाणे हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरूच,

0

पोलिस म्हणतात तपास सुरू; पण चोर सापडणार तरी कधी ?

देशमुख नगर(सतिश जाधव): भरदिवसा, पहाटेच्या साखर झोपेत घरफोड्या करून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख ऐवज लंपास करून चोरटे पसार होत आहेत. मागील अनेक महिन्यापासून बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे, पोलीस म्हणतात तपास सुरू पण चोर सापडणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. बोरगाव ठाणे हद्दीत मागील अनेक महिन्यांपासून भर दिवसा, रात्रीच्या घरफोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असताना एवढ्या झालेल्या घरफोड्यांच्या आजपर्यंत एक ही तपास पोलिसांना लागला नाही उलट प्रमाण वाढले आहे, यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अनेक दिवसांचा कालावधी उलटून देखील कसलाच मागून पोलिसांना लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे उत्तर मिळत असले तरी प्रत्यक्षात चोर सापडणार कधी ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे, पोलिसांनी हद्दीतील होणाऱ्या घरफोड्यांची दखल घेऊन, त्याचे गांभीर्य ओळखून स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून चोरांचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here