अनिल वीर सातारा : भारतीय बौद्ध महासभेतर्फे रविवार दि. २७ ऑक्टोंबर २०२४ रोजी महाविहार येथे बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर सातारा येथे गुरुवार दि.१० ते शनिवार दि.१२ रोजी श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व माजी श्रामणेर जे बौद्ध विधी करतात. त्या सर्वांनी बौद्धाचार्य परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. तरी भारतीय बौद्ध महासभा सातारा तालुका अंतर्गत धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त दि.१० ते दि. १२ पर्यंत माजी श्रामणेर यांना उजळणी प्रशिक्षण आयोजित केले असून सातारा जिल्ह्यातील सर्व माजी श्रामणेर यांनी त्याचा लाभ घ्यावा.
बौद्धाचार्य परीक्षेसाठी अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.धम्म कार्य गतिमान करण्यासाठी व बौद्धाचार्य घडविण्यासाठी आपल्या माजी श्रामणेर यांची आवश्यकता आहे.तरी सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, जावळी,वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील मागील पाच सहा वर्षांपासून झालेल्या माजी श्रामणेर यांनी या उजळणी प्रशिक्षण शिबीरासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम यांच्यावतीने करण्यात आले आहे.