भरधाव कार घुसली उसाच्या शेतात, सुदैवाने चालक बचावला

0

म्हाकवे: मुरगुड-निपाणी आंतरराज्य मार्गावर लिंगनुर-कापशी (ता. कागल) येथे भरधाव कारचा थरार पाहून ग्रामस्थ अचंबित झाले. रस्त्यावरुन जवळपास सहा फूट खाली असणाऱ्या ऊसाच्या शेतात कार उलटली अन् पुन्हा आत शेतात घुसली.
सुदैवाने अपघातात चालक बचावला असल्याची प्रतिक्रिया घटनास्थळी उमटत होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी, कार चालक हमिदवाडाकडून निपाणीकडे निघाला होता. दरम्यान भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उसाच्या शेतात घुसली. शेतात गुडघाभर दलदल असूनही कार जवळपास शंभर ते दीडशे फूट आत गेली होती. कारमध्ये चालक एकटाच असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दलदल असतानाही कार इतक्या आत गेलीच कशी याबाबत पाहणारे अजब करीत होते. अतिवेगामुळेच ही कार नियंत्रण सुटून एक वेळा उलटून आत गेली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here