सातारा/अनिल वीर : जिल्हा (पूर्व) अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आणि माण तालुका अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार सर्व पदाधिकारी, आजी माजी श्रामणेर, बौद्धाचार्य तसेच धम्म प्रचारक-प्रसारक यांनी गुरूवार दि ९ रोजी रोजी बुध्द विहार दहिवडी, ता.माण येथे सकाळी ११ वा. माण तालुका Indian Buddhist Mahasabha भारतीय बौद्ध महासभेच्या नूतन कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे.
तरी धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इच्छुक धम्मबांधव उपासक-उपासिका यांनी वेळेवर उपस्थित रहावे.कार्यकारिणीचा कालावधी संपला असून पुढील दोन वर्षांसाठी निवडी करण्यात येणार आहेत.अशी माहीती सिद्धार्थ बनसोडे (अध्यक्ष),श्रीमंत भोसले (सरचिटणीस),कुमार सरतापे (कोषाध्यक्ष) व सर्व पदाधिकारी यांनी दिली आहे.