गोंदवले -दिनांक २३ जुलै १९५५ रोजी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी भोपाळ येथे भारतीय मजदूर संघ या अखिल भारतीय गैर राजनैतिक कामगार संघटनेची स्थापना केली.
भारतीय मजदूर संघ सातारा जिल्ह्याच्या वतीने २३ जुलै हा वर्धापन दिन म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये साजरा केला जात आहे. दिनांक २०जुलै ते दिनांक २७ जुलै या अवस्थेमध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी गोंदवले खुर्द,सोकासन,पानवण ता.माण जिल्हा सातारा येथे बांधकाम कामगार महासंघ संघाच्या वतीने वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय मजदूर संघ सातारा जिल्ह्याचे औद्योगिक प्रमुख राजेंद्र काळे यांनी याप्रसंगी भारतीय मजदुर संघाची स्थापना कोणत्या परिस्थितीत झाली हे सांगितले. आज भारतीय मजदूर संघ देशाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचलेला आहे आणि सर्व 43 उद्योगांमध्ये भारतीय मजदूर संघाचे कार्य कसे चालते याची माहिती दिली. तसेच बांधकाम कामगार महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध योजना, बांधकाम कामगारांना त्याचा कसा फायदा होईल, याची संपूर्ण माहिती देण्यात आली, बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती देण्यात आली.
बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि नूतनीकरणांमध्ये आणि विविध लाभ मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा ऊहापोह बांधकाम कामगार महामंडळाचे सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस श्री विनोद केंजळे यांनी घेतला.
वर्धापन दिन कार्यक्रमाचा समारोप भारतीय मजदूर संघ सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष अॅड. सतीश सावंत यांनी केला. कार्यक्रमास गोंदवले पंचक्रोशीतील सुमारे 100 ब महिला आणि पुरुष बांधकाम कामगार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सोकासन व पानवण येथे ही बहुसंख्य कामगार उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ रेश्मा शीलवंत आणि सौ अस्मिता तुपे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास उत्तमराव फाळके यांनी आल्पोउपहाराची सोय केली होती सदर प्रसंगी मिस्टर सरपंच बाळासो गाढवे,सौ.रूपाली शिलवंत ग्रां.पं.सदस्या उद्योजक उत्तमराव फाळके उपस्थित होते. बांधकाम कामगार नोंदणीसाठी सौ.रेश्मा शिलवंत ७७४४०२२४९५ व सौ.अस्मिता तुपे ९८३४५९१५७५ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे आवहान केले आहे.