भारतीय मजदूर संघ सातारा यांच्या विद्यमाने गोंदवले खुर्द ता.माण आरोग्य शिबीर संपन्न.

0


गोंदवले – भारतीय मजदूर संघ सातारा यांच्या मार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडून शासनाकडे नोंदणी असणाऱ्या बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रम मारुती मंदिर गोंदवले खुर्द ता.माण या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला या तपासणी अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगार, त्यांची पत्नी व दहा वर्षांपेक्षा मोठी दोन मुले यांची आरोग्य तपासणी केली जाते यामध्ये २४ पेक्षा जास्त प्रकारच्या ( डेंग्यू, मलेरिया, टायफाईड,एच आय व्ही व रक्तातील ईतर सर्व घटक ) आरोग्य तपासण्या केल्या जातात या ठिकाणी १०० पेक्षा जास्त बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
      भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हाध्यक्ष शामराव गोळे,जनरल सेक्रेटरी रविंद्र माने, बांधकाम जिल्हाप्रमुख विनोदजी केजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये बांधकाम कामगार व  ईतर कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुखसुविधा योजना व लाभ याबाबत माहिती देण्यात आली तसेच बांधकाम कामगारांनी नोंदीत होण्याचे आवाहन करण्यात आले याप्रसंगी माण तालुका प्रतिनिधी सौ रेश्मा शिलवंत व सौ.अस्मिता तुपे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.रेश्मा शिलवंत सौ.अस्मिता तुपे यांनी अथक परिश्रम घेतले.
       सदर कार्यक्रमास गोंदवले परिसरातील राणंद, नरवणे,लोधवडे,मनकर्णवाडी, पिंपरी परिसरातील बांधकाम कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here