“भारतीय राज्यघटना व बहुसांस्कृतीकता” या विषयावर दि.३० रोजी व्याख्यान

0

सातारा :  महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी मंगळवार दि. ३०  रोजी सायंकाळी साडेसहा वाजता येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.शिवाजीराव पाटील यांचे ‘भारतीय राज्यघटना आणि बहुसांस्कृतिकता ‘  या विषयावर व्याख्यान होणार आहे.

   यावेळी प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे जीवन गौरव पुरस्काराचा वितरण सोहळा होणारआहे. साहित्य,कला, संस्कृती आणि समाज परिवर्तन या क्षेत्रात आयुष्यभर योगदान देणा-या व्यक्तिंना कोपर्डे प्रतिष्ठानच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतात.यावर्षीच्या संस्कृती क्षेत्राचा सात-तारा जीवन गौरव पुरस्काराने पुणे येथील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक , कादंबरीकार मकरंद साठे यांना तर कला क्षेत्राचा कृष्णामाई जीवन गौरव पुरस्काराने नाशिक येथील ज्येष्ठ चित्रकार, कवी, लेखक धनंजय गोवर्धने यांना डॉ. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सदरच्या समारंभास उपस्थित रहावे.असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद कोपर्डे,विश्वस्त डॉ. गजानन अपिने, डॉ. विजय चोरमारे, कवी वसंत शिंदे, ज्योत्स्ना पाटील – शिंदे व  ॲड. श्रेयस कोळेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here