अनिल वीर ,सातारा : भारतीय बौद्ध महासभा, कराड तालुका यांच्यावतीने दि.१३ डिसेंबर ते २४ डिसेंम्बर अखेर श्रामनेर व महिला उपासिका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तेव्हा नियोजनार्थ रविवार दि.२४ रोजी दुपारी १ वा. महाविहार येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या सभेत नियोजन करणे, गावाची निवड करणे, नवीन श्रामनेरांची नावे घेणे.ऐन वेळचे विषय याबाबत विचार विनिमय केला जाणार आहे.तेव्हा सम्बधितांनी वेळेवर उपस्थीत रहावे.असे आवाहन तालुकाध्यक्ष बी.जे.माने आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.