मतभेद न करता संघटित लढ्यासाठी सज्ज झाले पाहिजे !

0

सातारा : देश कठीण परिस्थितून जात आहे.तेव्हा कोणत्याही प्रकारचे मतभेद अथवा हेवेदावे न करता संघटित लढा उभारला पाहिजे.तरच महापुरुषांच्या विचारांवर देश चालु शकेल.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी यांनी केले. 

                 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ माजी पंतप्रधान व्हि.पी.सिंग यांचा स्मृती दिन,यशवंतराव होळकर व बहिणाबाई चौधरी यांची जयंती, भारताचे पहिले पंतप्रधान डॉ. राजेंद्र प्रसाद व संत रोहिदास आदी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.तेव्हा वीर बोलत होते.याशिवाय,ऍड.हणमंत ज्ञानदेव पन्हाळे यांच्या निधनाबद्धल त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार ऍड. हौसेराव धुमाळ यांनी अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.तसेच दिव्यांग जागतिक व वकील दिनानिमित्तही शुभेच्छा देण्यात आल्या.आशा अनेक विषयांवर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.

अनिल वीर म्हणाले,”ज्यांनी ओबीसी साठी मंडल आयोग लागू होण्यासाठी व्हि.पी.सिंग यांनी आपले प्रधानमंत्री पद पणाला लावले होते.त्यावेळी विविध ओबीसी संघटना असल्या तरी प्रभावी काम करणारा एकमेव मसिहा व्ही.पी. सिंगच. तेव्हा राजकीय नाड्या या ओबोसींच्या हातातच राहण्यासाठी एकसंघपणे लढणे गरजेचे आहे. राज्यकर्ते ओबीसींचा वापर करून घेतात.तेव्हा त्यांनी यापुढे कोणत्याही भुलथापाना बळी न पडता महापुरुषांच्या विचारांवर वाटचाल केली पाहिजे. ओबीसीसह इतर सर्वच बहुजनांनी एकत्रीत येणे काळाची गरज आहे.रस्त्यावरील हक्काच्या लढाया या लक्ष्य केंद्रित करण्यासाठीच.मात्र,अंतिम निकाल हा कायदा व सर्वोच्च न्यायालयातच मिळेल.तेव्हा एकामेकास दूषणे देऊन वेळ कोण्हीही वाया घालवू नये. राज्यकर्त्यांनी विकासात्मक धोरणावर काम केले पाहिजे. ज्यांनी डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांना मरणोत्तोर “भारत रत्न” किताब  दिला. त्या माजी पंतप्रधान व्ही पी.सिंग यांना मानाचा सलाम.”

 यावेळी शाहिर प्रकाश फरांदे, गौतम भोसले,अमर गायकवाड आदींनी ऍड. पन्हाळे यांच्याबद्धल माहीती कथन केली.याशिवाय, संयुक्त जयंती समारोह समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे आदींनीही वेगवेगळ्या विषयांवर माहिती कथन केली.प्रथमतः डॉ. आंबेडकर पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण अभिवादन केले. संपूर्ण विधी दिंपकरजी यांनी पार पाडला.साहित्यिक सुदर्शन इंगळे, केले.सदरच्या कार्यक्रमास पसंस्थेचे चेअरमन अशोक भोसले, माजी प्राचार्य प्रकाश रणबागले,माजी केंद्रप्रमुख रामचंद्र गायकवाड,संविधान लोकजागर परिषदेचे अध्यक्ष भगवान अवघडे,बाळासाहेब सावंत,शाहिर श्रीरंग रणदिवे, प्रकाश सावन्त,बी.एल. माने, मधुसूदन काळे,सत्यजीत गायकवाड, विलासराव कांबळे, शामराव बनसोडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते व विकास तोडकर त्यांच्या मुलीसह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here