मताधिकार बजावणाऱ्या नागरिकांची सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न !

0

सातारा : मताधिकार बजावणारे नागरिक या विषयावर चर्चा करण्याकरिता येथील नगरपालिकेजवळ सेंट्रल प्लाझा येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

             सदरच्या सभेत जनतेचा जाहीरनामा सुधारीत करण्यात आला. विधान सभा निवडणूक 2024 साठी जनतेची राजकीय रणनीती ठरविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.जनतेचा जाहीरनामा लोकसभेच्या निवडणुकीतही इंडिया आघाडीला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला होता.त्याचे नेतृत्व  विश्वास उटगी (मुंबई) करणार आहेत..सरकार जनतेसाठी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी असते.

आता विधानसभा निवडणुका येत आहेत. शिवाय,पुढे अन्य निवडणुका येतील.तेव्हा जनतेला राजकीयदृष्ट्या जाहीरनाम्यात योग्य ते बदल केले पाहिजेत.तेव्हा  सभेत सहभाग नोंदवून जनतेचा जाहीरनामा सुधारित करून जनतेची राजनीती सर्वानुमते ठरवण्यात आले.तेव्हा आपले वैचारिक योगदान द्यावे.असे ठरवण्यात आले.शाहिर भानुदास गायकवाड,अनिल वीर वश्रीपती माने यांनी स्वागत केले.प्रकाश खटावकर यांनी सूत्रसंचालन केले तर भगवान अवघडे यांनी आभारप्रदर्शन केले.यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here