मलठणमध्ये शुक्रवारी अथर्वशीर्ष पठण

0

फलटण : येथील मलठण गणेशोत्सव मंडळ यंदा 27 व्या वर्षात पदार्पण केले आहे. शुक्रवार दि. 13 रोजी यावेळी सकाळी 7 वाजता अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.
माजी नगरसेवक अशोकराव जाधव व माजी नगरसेविका सौ. विजयाताई जाधव यांचे मार्फत लकी ड्रॉ पद्धतीने अकरा पैठणी साड्यांची भेट देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

यावेळी मलठण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य हालते देखावे तसेच पॅरिसचा आयफेल टॉवर व अनेक मंदिरांची प्रतिकृती उभारण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. मलटण गणेशोत्सव मंडळ यावर्षी भव्य विठ्ठल मंदिराचा देखावा सादर करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष अभिजीत नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष जयवंत शिंदे, बबलू पवार व सचिव अमोल घाडगे व आशिष भोसले तसेच खजिनदार ओंकार गायकवाड या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सभासद यांचे विशेष आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here