सातारा : दीपलक्ष्मी नागरीक सहकारी पतसंस्था व सुहाना सफर ग्रुप प्रस्तुत महान गायक मुकेश यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी गायलेल्या सदाबहार गीतांची सुश्राव्य मैफिल “शतायु मुकेश” हा दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
“शतायु मुकेश” सदाबहार गीत मैफिलीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक,शाहूपुरी पोलीस स्टेशनचे धनंजय फडतरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अ.भा.मराठी साहित्य महामंडळ सदस्य विनोद कुलकर्णी, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, पुणे शहर प्रतिनिधी-म.सा.प.पुणे व दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस, कराओके सिंगर्स क्लबचे,अध्यक्ष विजय साबळे, संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व मुकेश च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली.साताऱ्यातून अनेकानी विविध क्षेत्रात भरारी मारली आहे.त्यामुळे मिळालेली संधी युवापिढीने दवडू नये.
“शतायु मुकेश” या सारख्या हृदयस्पर्शी हिंदी गीतांच्या सुश्राव्य मैफिली ची संकल्पना विजय साबळे यांची होती. सदर कार्यक्रमात डॉ.लियाकत शेख, विजय साबळे, बापूलाल सुतार,वनिता कुंभार, रेवती बंड, मंजिरी दीक्षित,गायक कलाकार यांनी आपली सुमधुर सुश्राव्य गीते सादर केली.सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
सदाबहार गीत मैफिलीस सचिन शेवडे यांची ध्वनी व्यवस्था लाभली होती.रात्री उशिरापर्यंत गाण्यांची मैफिल रंगतदार सजली होती.सदरच्या कार्यक्रमास विकास गोसावी,शुभम बल्लाळ, आग्नेश शिंदे, सर्व अधिकारी, पदाधिकारी,समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावून आनंद लुटला.