सातारा/अनिल वीर : समाजात दुराचारी लोक पावलो-पावली आढळून येतत्. तेव्हा चळवळ व धम्म यासाठीच मानवाचे जीवन व्यतीत करावे.बुद्ध,शाहु, आंबेडकर, शिवराय आदी महापुरुषांच्या विचाराशिवाय तरणोपाय नाही.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार विभागाचे उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक भागवत भोसले यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजीत केलेल्या कार्यक्रमात भागवत भोसले यांनी धम्मदेसना दिली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते.
भागवत भोसले म्हणाले, “धम्माला शरण गेल्याशिवाय महानता प्राप्त होत नाही.बुद्धांनी मैत्री,करुणा,सदभावना आदीद्वारे दुःखाच्या कारणांचा शोध लावला.विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान बुद्धांनी दिले.मानवी जीवनाच्या कल्याणार्थ बुद्ध विचार दिले. हजारो वर्षाच्या गुलामगीरीतून बाबासाहेबांनी बाहेर काढले. धम्मदीक्षेनंतर हळू हळू बदल झालेला आढळून येत आहे.”
पुणे येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या धम्मचारिणी तारान्विता यांनी दिलसे बोलो मजबुरिसे नहीं,दिमाखसे बोलो असा जयभीमचा नारा देत मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या, “मानवाची प्रगती उत्तरोत्तर झाली आहे.जे काही उपभोगले जाते ते केवळ बासाहेबांच्यामुळेच.मनाचे आचरण महत्वाचे असून मन व शरीराचा विकास झाला पाहिजे. बाबांनी सर्व सर्व धर्मियांचा अभ्यास सुमारे २१ वर्षे केला होता.आपणास फक्त आपल्या एकाच धर्माचा अभ्यास करायचा आहे.धार्मिकता ही मनासाठी वारसा दिला आहे. जयंती उत्सवाच्या माध्यमातून गुणांचे स्मरण केले पाहिजे. धम्माच्या विचारान्वयेच नवनिर्मिती होईल.अन्नाची गरज असल्यानेच सुजाताने दिलेली खीर बुद्धांची प्राशन केली.१०० वर्षांमध्ये एखदाही बाबासाहेब यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व जन्माला आले नाही. मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. स्वतः चे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत.ध्यान बुद्धाबरोबरच बाबांनीही केले होते.त्यामुळे आपल्या जीवनात ध्यानास महत्व आहे.अहंकार बाळगता कामा नये.खोट्या मार्गाने मिळविलेली कीर्ती/स्तुती जास्त काळ टिकत नाही.मनाचा विकास केला तरच आनंद मिळतो.”